‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतदिलखुलासकार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 09 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि  महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे  यांची हक्काचं घर : सर्वांसाठीया विषयावर मुलाखत होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट  रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 यावेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.12 आणि मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत दाखविण्यात येणार आहे.  निवेदक राजेंद्र हुंजे यांनी  ही  मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थातच म्हाडाचे धोरण, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे धोरण, झोपडपट्टी पुनर्विकास आणि त्यासंबंधी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय  शहरी पुनरुत्थान अभियान, संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे देण्यासाठी शासनाची भूमिका, आणि महाराष्ट्र गृहनिर्माण नियमन आयोग अर्थात महारेरा आदी विषयांची माहिती श्री. वायकर आणि श्री. मिरगणे  यांनी जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमातून  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा