महाराष्ट्राच्या ११ सेना अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार; प्रकाश जाधव यांना किर्ती चक्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

   नवी दिल्ली, दि. 14 : वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी आज शौर्य पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्राच्या 11 जणांचा समावेश आहे. प्रकाश जाधव यांना मानाचा किर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.


तिन्ही सेना दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदक मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये दोन किर्ती चक्र, एक वीर चक्र, 14 शौर्य चक्र, 8 बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदक(शौर्य), 5 नौसेना पदक(शौर्य),7 वायुसेना पदक (शौर्य), 5 युध्दसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे.   

प्रकाश जाधव यांना ‘किर्ती चक्र’

महाराष्ट्राचे सुपुत्र लष्कराचे जवान प्रकाश जाधव यांना मानाचा किर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. जाधव हे लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनीअर-फर्स्ट बटालियन ऑफ राष्ट्रीय रायफलचे जवान आहेत.

दोघांनाशौर्य चक्र’
लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्य चक्र जाहीर झाले.

दोन : ‘बार टू सेना मेडल’
मेजर सागर प्रकाश परदेशी  यांना ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे.

तिघांना सेना पदक
अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर , मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे.    

दोन : वायुसेना पदक
भारतीय वायुसेनेचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्कॉड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायुसेना पदक जाहीर झाले आहे.

र कमोडोर सुनिल विधाते यांना ‘युध्दसेवा पदक’ तर तटरक्ष दलाचे इंस्पेक्टर जनरल मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘तटरक्षक पदक’ जाहीर झाले आहे.   
000000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.190 दिनांक  14.08.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा