‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शुक्रवारी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची 'जलसंधारणातून जलसमृद्धी' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 यावेळेत दाखविण्यात येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


जलसंधारण विभागामार्फत घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, जलयुक्त शिवार अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान, जलयुक्त शिवार अभियानाची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी घेण्यात आलेली खबरदारी, मागेल त्याला शेततळे ही योजना, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, मृद व जलसंधारण आयुक्तालय सुरू करण्यामागची भूमिका आदी विषयाची सविस्तर माहिती श्री. शिवतारे यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा