महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नवी दिल्ली, दि. 15 : भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त  समीर सहाय यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे  पथसंचलन  झाले.
 

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, सहायक निवासी आयुक्त सर्वश्री  विजय कायरकर, अजितसिंह नेगी तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, दिल्ली स्थित विविध क्षेत्रातील मराठी भाषीकही या कार्यक्रमास उपस्थित होते.राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी  देशवासियांना संबोधित केले. या मुख्य कार्यक्रमात आप-आपल्या राज्यांचा पारंपरिक वेश परिधान केलेले प्रतिनिधीही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने 40 स्त्री -पुरुषांच्या चमूने फेटा, धोतर, सदरा आणि नऊवारी साडी, नथणी परिधान करून  उत्साहाने सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
000000रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.192 / दिनांक  15.08.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा