कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात स्वच्छता मोहीम गतिमान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतकोल्हापूर, दि. 13 :  महापुरामुळे शहर आणि जिल्ह्यात वाहून आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आज प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेने तर नगरपालिकेने आणि गावागावात ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम गतिमान करण्यात आली आहे. याकामी प्रशासनाबरोबर विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सहभाग घेतला आहे. याबरोबरच जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी अर्थमूव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुप आणि पोकलेन ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा