पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविणार - पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 9 : राज्यातील पाणी गुणवत्ता बाधित गावे/वाड्यात शासनामार्फत ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा (आरओ) कार्यान्वित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात या पाणी शुद्धीकरण यंत्रणेतून ग्रामस्थांना थंड पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर चिलर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये डीएफयू, आरओ, यूव्ही, यूएफ व वॉटर चिलर बसविणे बाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. त्यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


श्री.लोणीकर म्हणाले, नीती आयोगामार्फत राज्यातील फ्लोराईड बाधित 122 गावे/वाड्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा (डीएफयू) कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत राज्यातील क्षारबाधित 111 गावे/वाड्यात पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील फ्लोराईड बाधित 100 गावे/वाड्यात हातपंपावर आधारित पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाची निविदा तयार करुन मंजुरीसाठी सादर केली आहे.


चंद्रपूर व जालना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणाऱ्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेत सुमारे 300 वॉटर चिलर बसविण्याबाबतची निविदा 9 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा