विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



नवी दिल्ली,  दि. 19 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.


निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै 2019 रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2019 आहे. निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑगस्ट 2019 रोजी होईल.

औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज पासून तात्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.


000000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.164 /  दिनांक  19.०७.२०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा