वडाळा येथील मंदिरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पूजा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 12 : आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज पहाटे सपत्नीक विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची विधिवत पूजा केली.

महाराष्ट्राच्या जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना आज विठ्ठलाच्या चरणी श्री. तावडे यांनी केली. राज्यात पाऊस पडू दे, पीक येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी राहू दे हे हीच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा