चंद्रपूर जिल्ह्यातील नांदाफाटा पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 9 : जलस्वराज्य प्रकल्प-2 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील नांदाफाटा पाणीपुरवठा योजनेसाठी 902.55 लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन जवळपास दोन माहिने उलटूनही कामाची गती कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नांदाफाटा पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.


आज मंत्रालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव अभय महाजन  व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


श्री.लोणीकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील नांदाफाटा पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र 3.50 द.ल.लि. क्षमतेचे असून भौतिक प्रगती 90% आहे. तर पाण्याच्या टाकीची क्षमता 5.07 लक्ष लिटर्स आहे. 70 लिटर प्रती माणसी प्रतिदिन एवढे पाणी वर्षभर नागरिकांना उपलब्ध होणार आहे. घरगुती नळ जोडणी 15 मिमी.व्यास आहे. या योजनेमुळे सर्व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबाजावणी करण्याचे निर्देश श्री. लोणीकर यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा