‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात मतदारांसाठी 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम' या विषयावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. २३ जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके  यांनी ही मुलाखत घेतली आहे.


नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली तयारी, मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेचे स्वरूप, मतदारांना नाव नोंदणीसाठी असलेल्या अर्जाचे वेगवेगळे नमुने, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे स्वरूप आदी विषयांची माहिती श्री. शिंदे  यांनी दिलखुलास' या कार्यक्रमातून  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा