राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 16 : दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील श्री. ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळींचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे.
-----000-----


Lost the Guiding Light of Ambedkarite Movement - CM
Mumbai, Date. 16th: Dalit Panthers' co-founder Raja Dhale was a strong personality and with his death, we have lost a guiding light to Ambedkarite movement, expressed CM Devendra Fadnavis.
CM says in the condolence message, Mr. Dhale was a studious and idealistic personality in the movement for equality.  He provided an effective stage to the aspirations of deprived and downtrodden through the medium of Dalit Panther.  This movement is an important chapter in the political history of Maharashtra and the country.  This movement's struggle in the decade of seventies gave a new direction to Ambedkarite movement. Mr. Dhale has a great contribution in Ambedkarite movement. We have lost a spirited leader, talented writer and the important commenter of the revolutionary movement.

0000


आंबेडकर आंदोलन के वरिष्ठ मार्गदर्शक हुए हम सबसे दूर - मुख्यमंत्री
मुंबई, दि। 16: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दलित पैंथर के एक प्रमुख संस्थापक राज ढाले के निधन के कारण आंबेडकर आंदोलन के मार्गदर्शक रहे व्यक्तित्व को खोने का दुःख व्यक्त किया है। अपने शोक संदेश में, मुख्यमंत्री ने कहा कि श्री ढाले समति के संघर्ष में एक अध्ययनशील और कट्टरपंथी व्यक्ति थे।
दलित पैंथर के माध्यम से, उन्होंने समाज के वंचित और उपेक्षित वर्गों को उन्होने एक प्रभावी मंच प्रदान किया। यह आंदोलन न केवल महाराष्ट्र में बल्कि देश के इतिहास में एक महत्वपूर्ण त्योहार है। सत्तर के दशक में जो संघर्ष हुआ, वह अंबेडकर आंदोलन का नया आयाम था, और श्री ढले का योगदान बहुत मूल्यवान था। उनके निधन में, एक योद्धा नेता, प्रतिभाशाली साहित्यिक और परिवर्तनवादी आंदोलनों के महत्वपूर्ण टिप्पणीकार को खो दिया है।

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा