संगणक क्षेत्रातील ‘एचपी’च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 23 : संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हॅवलेट पकार्ड (एचपी) या कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.


यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनिओ नेरी यांनी कंपनीच्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. राज्यातील स्मार्ट सिटीज, ई-हेल्थ केअर, एआय-स्किल इंडिया अशा विविध क्षेत्रात एचपी कंपनी काम करीत आहे. यापुढेही राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वाय-फाय तंत्रज्ञानाशी निगडीत विविध प्रकल्पात काम करण्यास स्वारस्य असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘हॅवलेट पकार्डसोबत राज्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत. आता या प्रकल्पांना आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे. यामुळे विविध क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उपयुक्तता सिद्ध होईल.
००००
A delegation of Hewlett Packard Company
visited Chief Minister Devendra Fadnavis
Mumbai, 23.July.19: A delegation of Hewlett-Packard, a noted company in Computer and Information Technology sector visited Chief Minister Devendra Fadanvis in the Ministry Office on today.
At this time, the CEO of the company, Antonio Neri, informed about the company's various ongoing projects in Maharashtra. Hewlett-Packard Company is working in various sectors like Smart Cities, E-Health Care, AI-Skill India, in the state. Mr. Neri stated that his company is also interested in working on various projects related to the Wi-Fi technology implemented in the urban and rural areas of the state.
“There are several projects underway in the state along with Hewlett Packard. Now these projects need to be accelerated. This will prove the usefulness of these ambitious projects in various fields” said Chief Minister Devendra Fadanvis.
Members of the delegation and officers from the Ministry Office were present on the occasion.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा