मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या विचाराधीन - राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नवी दिल्ली, दि. २ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय केंद्र शासनाच्या विचाराधीन असल्याची  माहिती,  केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने  केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. सदरील प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या भाषा विषयक तज्ज्ञ समिती समोर असल्याचे श्री .पटेल यांनी सांगितले .

मद्रास उच्च न्यायालयात दाखल झालेल्या भाषाविषयक रिट याचिकांमुळे मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव  मंत्रालयाकडे प्रलंबित होता. मद्रास उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०१६ रोजी  याबाबतच्या सर्व याचिका निकाली काढल्या. यामुळे, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असून, या विषयाशी निगडीत अन्य मंत्रालयांसोबत आणि  साहित्य अकादमीच्या  माध्यमातून भाषा तज्ज्ञांच्या समितीसमोर हा विषय  ठेवण्यात आल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.    

000000 

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.१४९ /  दिनांक  ०२.०७.२०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा