माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 22 : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांनी शैक्षणिक वर्ष 2018 -19 मध्ये दहावी आणि बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.शिष्यवृत्ती मिळण्याकरिता 15 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई -01 येथे अथवा 022- 22700404 यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा