‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून’ महाराष्ट्रात ८९ हजार रोजगार

1 टिप्पणीनवी दिल्ली दि. 11 : ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ (पीएमईजीपी) गेल्या तीन वर्षात देशभरात 13 लाख 82 हजार 440 बेरोजगारांना काम मिळाले आहे तर, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली मध्ये 89 हजार 567 जणांना रोजगार मिळाला आहे.


सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत  महाराष्ट्र राज्याचा दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासह आणि गुजरात राज्याचा दिव व दमण या केंद्रशासित प्रदेशासह  देशातील 25 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2016-2017 , 2017-2018 आणि  2018-2019  या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या रोजगार निर्मितीची माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी  यांनी लोकसभेत लिखित उत्तरात दिली.

महाराष्ट्र, दादरा-नगर हवेलीत 89 हजार 567 रोजगार

महाराष्ट्र व दादरा नगर हवेली मध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 65 हजार 872  रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेची उत्तम अंमलबजावणी होऊन इच्छित लक्षापेक्षा अधिक म्हणजे 89 हजार 567  एवढी रोजगार निर्मिती झाली आहे.  वर्ष 2016-2017  मध्ये 17 हजार 799 , वर्ष 2017-2018  मध्ये 26 हजार 632 तर  वर्ष 2018-2019 मध्ये45 हजार 136  रोजगार निर्मिती झाली.

देशात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 14 लाख 83 हजार 808  रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. यापैकी 13 लाख 82 हजार 440  एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. देशात अनुक्रमे वर्ष 2016-2017  मध्ये 4 लाख 7 हजार 840 , वर्ष 2017-2018  मध्ये 3 लाख 87 हजार 184  तर वर्ष 2018-2019  मध्ये 5 लाख 87 हजार 416  रोजगार निर्मिती झाली आहे.


1 टिप्पणी

  1. But sir kuthlya source madhun Jaga bharlya gelya samjle nahi.
    Karan me continue sites var updated asto aani majhe NCS var pan profile ahe ,pan kahi recruitment baddal email ,SMS kahich milale nahi.Aani evdhe rojgar kase kuthe available shale kalat nahiye.

    उत्तर द्याहटवा