‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 'शेतकऱ्यांसाठी केला संकल्प….' या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 2 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  मंगळवार  दि.2 आणि बुधवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी  ही  मुलाखत घेतली आहे.


कृषी आणि संलग्न क्षेत्राचे स्थूल राज्य उत्पन्नात योगदान वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न,  शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची अमंलबजावणी, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी फिरते चिकित्सालय, राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली भरीव तरतूद,  नगरविकास विभागासाठी करण्यात आलेली तरतूद, रोजगार निर्मितीवर भर देण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेली पावले आदी विषयांची माहिती 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा