माजी नगरपाल कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाने 'समाजगौरव' व्यक्तिमत्व गमावले - राज्यपालांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 18 : माजी नगरपाल व उद्योजक कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई महानगरीने एक समाजगौरव व्यक्ती गमावली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  
  

मुंबईचे माजी नगरपाल श्री कुलवंतसिंग कोहली एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिक जडणघडणीचे ते एक डोळस साक्षीदार होते. यशस्वी उद्योजक असलेल्या कोहली यांचा विविध सामाजिक वर्तुळांमध्ये वावर होता. शीख समुदायाच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असत. त्यांनी केलेले समाजकार्य व्यापक होते. असेही राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  

००००


“Kulwant Singh Kohli was a Samaj Ratna”: Governor

Mumbai Dated 18 :The Governor of Maharashtra CH. Vidyasagar Rao has expressed grief over the demise of former Sheriff of Mumbai Shri Kulwant Singh Kohli. In a statement, the Governor said:

“Former Sheriff of Mumbai Shri Kulwant Singh Kohli was a lively and cheerful person. A successful business leader, he was a witness to the socio-cultural and economic development of Maharashtra. Shri Kohli remained in the forefront of social and religious functions organized by the Sikh community of Mumbai. He was a pride of the community. His social work was vast and varied. In his demise, the city of Mumbai has lost a popular Samaj Ratna.”
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा