दोन वनरक्षक पुरात वाहून गेल्याची घटना अतिशय दुर्दैवी; शासन दोन्ही कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 22 : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. भारंबा गावाजवळील नाल्यामधून जात असताना कन्नड वन परिक्षेत्राच्या तळेगाव बीटचे  वनरक्षक राहुल दामोदर जाधव (वय ३०)आणि जैतखेडा बीटचे अजय संतोष भोई (वय २५) हे दोन वनरक्षक वाहून गेले.  दोघांचे मृतदेह सापडले आहेत.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या दोघांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत आणि शासन भक्कमपणे त्यांच्या़ पाठीशी उभे आहे असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद प्रादेशिक वनवृत्त कार्यालयाच्या वतीने या दोन्ही कुटुंबियांना तातडीच्या स्वरूपात करावयाची सर्व प्रकारची मदत देण्यात आली आहे. तसेच नियमानुसार जी मदत दिली जाते तीही त्यांना दिली जाईल, असे ही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा