पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी राज्य शासनाचा पुढाकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई पोलिसांच्या पोलीस कल्याण विभागामार्फत सहा नवीन योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

मुंबई, दि. 3 : पोलिसांच्या शासकीय घरांबरोबरच त्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पोलिसांच्या स्वतःच्या घरांसाठी आखण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान देऊन मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


मुंबई पोलिसांच्या पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सहा नवीन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रसाद लाड, पोलीस आयुक्त संजय बर्वे, सहपोलिस आयुक्त नवल बजाज, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.


पोलिसांच्या मुलींना शिक्षणाच्या मदतीसाठी सुरू केलेली सुकन्या योजना, आरोग्यासाठीची हेल्थिझम कार्ड, मुलांच्या शिक्षणासाठीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म टॉपर्स ॲप्स, संगणक प्रशिक्षण वर्ग, पोलिसांच्या वैयक्तिक खटल्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला, वाहतूक पोलिसांना गॉगल्स वाटप या योजनांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलिसांचा कोणताही प्रस्ताव आल्यास  तो तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात पोलिसांच्या शासकीय अथवा मालकी हक्कांच्या घरासंदर्भात अनेक निर्णय घेतले. त्यामुळे या काळात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे. तसेच घरे देण्याची गतीही वाढली आहे. पोलिसांसाठी नवीन कॉलनी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या कॉलनीमध्ये इतर सुविधांबरोबरच जिम व मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र असावे, यावर लक्ष दिले आहे.


पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी व्याजदर योजना, नोंदणी व मुद्रांक शुल्कात सवलत, चटई क्षेत्रात सूट आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विविध योजनांच्या माध्यमातून पोलिसांना परवडणाऱ्या दरात घरे मिळण्यासाठी राज्य शासन नेहमीच पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.


पोलीस दल हे एक कुटुंब असून या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आरोग्य, शिक्षण आदींच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात पोलिसांना आपल्या व आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे हेल्थिझम कार्ड उपयुक्त ठरेल. निवृत्त पोलिसांना आरोग्यविषयक योजना नव्हत्या. त्यामुळे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निवृत्त पोलिसांचा समावेश केला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


गृहराज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, मुंबई शहर हे अद्भूत शहर असून या शहरासमोरील आव्हाने वेगळी आहेत. याबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानामुळे हे आव्हान वाढले आहे. मात्र मुंबई पोलीस अतिशय सक्षमतेने हे आव्हान पेलत आहेत. अशा पोलिस खात्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात आमूलाग्र बदल केले आहेत. सीसीटीव्ही, सीसीटीएनएस, सायबर पोलीस असे अनेक उपक्रम सुरू केले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणसाठी 2 हजार 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. पोलिसांना पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या आकाराची घरे देण्यात येत आहेत.


आयुक्त श्री. बर्वे यांनी विविध योजनांची माहिती व त्या सुरू करण्याची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी सुकन्या योजनेतील पोलिसांच्या पाच मुलींना प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आला तसेच हेल्थिझम कार्डचेही प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
0000State Government will take initiative for Police Home - Chief Minister Devendra FadanvisMumbai, 3.Jul.19: “Apart from government quarters, police should get their own house. State government have taken several important decisions regarding this and are continuously taking the follow up State government will take initiative to raise grant for the schemes to provide own house for police employees” said Chief Minister Devendra Fadnavis.

He was speaking in a programme organized to launch new schemes to be implemented for police and their families. Inauguration of the schemes launched by the Sukanya Yojana for daughters of police, healthism card for health, online platform toppers apps for children's education, computer training classes, free legal advice for police personnel court case, and goggles distribution for traffic police also took place by the hands of Honorable Chief Minister, on this occasion.

Mr. Fadanvis informed that new six schemes would be implemented by Police Welfare Department for police and their families.

He further stated that if any police employees send any proposal comes, then it has been granted immediate approval. In the last five years, many decisions have been taken in relation to the government's or official rights of the police. So, in the meantime, a large number of homes have been created for the police. Also, the speed of house providing is increased. Work of set up of new colony for the police is going on. The colony will many amenities like gym and skill development center for children.

To get own house for police, government has launched interest rate scheme which included concession in registration and stamp duty amount, mat area discount. State government will always take the initiative to provide affordable housing to the police through various schemes, informed Mr. Fadanvis

“Police force is like a family and hence plans for health, education have been started to take care of this family. In cities like Mumbai, police do not have time to take care of their families. Therefore, the healthism card will be proved beneficial. The retired police did not have any health plans. Hence, the retired police has been included in Mahatma Phule Jeevandayi Arogya Yojna” said Chief Minister.

Home Minister for State Dr. Ranjeet Patil said that Mumbai is a miraculous city and its challenges are different. This challenges have increased due to the latest changing technologies. However, Mumbai Police has been getting this challenge very efficiently. In this police department, the Chief Minister has made radical changes in the last five years. CCTV, CCTNS and Cyber Police have started a number of such initiatives. For the modernization of police force, Rs. 2100 crores have been spent. The police are being given larger sized houses than before.

Police Commissioner Sanjay Barve explained the plans for police department and their background. At this time, five girls of police employees were given check under the Sukanya Yojana. Distribution of healthism card also took place on this occasion


MLA Prasad Lad, Assistant Police Commissioner Naval Bajaj, Vinay Kumar Choubey and other concerned people were present on this occasion.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा