माऊंट कांचनजूंगाची यशस्वी चढाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गिर्यारोहकांचे अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. १७ : भारतातील सर्वोच्च माऊंट कांचनजूंगा शिखर सर केलेल्या पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

या यशस्वी चढाईत जगात पहिल्यांदा दहा जणांच्या चमूने एकत्रित एकाच दिवशी हे शिखर सर करण्याचा विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती गिरीप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे यांनी दिली. गिरीप्रेमीच्या या चमुत आनंद माळी, भूषण हर्षे, रूपेश खोपडे, किरण साळस्तेकर, सुमित मांदळे, जितेंद्र गवारे, विवेक शिवदे, कृष्णा ढोकले, प्रल्हाद जोशी, आशिष माने यांचा समावेश आहे.

या चमूने प्रत्यक्ष ४५ दिवसांच्या चढाईत १५ मे २०१९ रोजी कांचनजुंगाचे हे ८ हजार ५८६ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या चमूचे या यशस्वी चढाईसाठी कौतुक करून पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा