‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास'मध्ये उद्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची सिंचन योजना : पूर्णतेकडेया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.26 जुलै 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे आणि दिलखुलास कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दिनांक 27 आणि सोमवार दिनांक 29 जुलै 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

दोनशे पाच (205) पाटबंधारे प्रकल्पांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी केलेले प्रयत्न, नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन, थेट खरेदीद्वारे भूसंपादन, सूक्ष्म सिंचनावर केंद्रीत करण्यात आलेले लक्ष, अवर्षणग्रस्त भागातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प, एकात्मिक राज्य जल आराखड्याची सद्य:स्थिती, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे पाणी देणासाठी विशेष मोहिम आदी विषयाची सविस्तर माहिती श्री.शिवतारे यांनी जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा