खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवरही तोडगा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

1 टिप्पणी


मुख्यमंत्र्यांची 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी चर्चा

मुंबई, दि. 14 : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाहीत, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल.



मुख्यमंत्री म्हणाले, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजनांसाठी यंत्रणा उभारण्यात येईल. राज्य शासन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 604 अभ्यासक्रमांकरिता 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. 

या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, नेत्र रोग विशेषज्ञ तथा अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने व शिष्टमंडळाचे डॉ.संजय देशपांडे, डॉ.अनुप मरार, अनिल लद्धड आदी उपस्थित होते.
0000



खुले प्रवर्ग के विद्यार्थियों की समस्याओं पर भी उपाय निकालेंगेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आश्वासन


मुंबई : विविध घटकों के आरक्षण के कारण वैद्यकीय स्नातक एवं स्नातकोत्तर प्रवेश की सीटों में खुले प्रवर्ग की कम हुई सभी सीटें बढ़ाकर क्षति भर दी जाएगी, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा. 
'सेव मेरिट, सेव नेशन' मुहिम के प्रतिनिधि मंडल के साथ सह्याद्री अतिथीगृह में चर्चा करते समय वे बोल रहे थे. मुख्यमंत्री श्री फडणवीस ने आगे कहा कि, इस आरक्षण से खुले वर्ग के जिन पात्र विद्यार्थियों के प्रवेश इस साल नहीं हो सके है वे  निजी शिक्षा संस्थाओं में प्रवेश ले. उनके इस वर्ष की शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती सरकार की ओर से की जाएगी.
मुख्यमंत्री ने कहा, खुले वर्ग के विद्यार्थियों की समस्या को जानकर उसके ऊपर उपाययोजनाओं के लिए यंत्रणा तैयार की जाएगी. राज्य शासन खुले प्रवर्ग के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक के विद्यार्थियों के लिए 604 पाठ्यक्रमों के लिए 50 फीसदी शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपति शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना चलाई जा रही है. साथ ही ओबीसी और खुले प्रवर्ग के विद्यार्थियों को विदेश में शिक्षा लेने के लिए छात्रावृत्ति दी जा रही है.  
इस बैठक में मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण एवं औषधि द्रव्य विभाग के सचिव डॉ. संजय मुखर्जी, नेत्र रोग विशेषज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने एवं शिष्टमंडल के डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार, अनिल लद्धड आदि उपस्थित थे.
0000

CM assures to resolve open category students’ issues

Mumbai, July 14: Chief Minister Devendra Fadanvis today assured that the deficit of seats for open category students in medical graduation and post-graduation admissions caused by reservation to various social communities will be compensated by increasing the number of seats in open category.
He was speaking to the delegation of “Save Merit, Save Nation” movement at Sahyadri Guest House today. Chief Minister Fadanvis further said that those eligible open category students could not get admission due to reservation should seek admission in private colleges and the government will reimburse their current year’s tuition fees.
The Chief Minister said that a system will be set up to study the problems of the open category students and find out suitable measures to resolve them. The state government is implementing 50 percent tuition fees reimbursement scheme for 604 courses for the economically weaker open category students through Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Educational Reimbursement Scheme. Besides, scholarship for education in foreign universities is given to the students of OBC and open category students, he added.
The meeting was attended by CM’s Principal Secretary Bhushan Gagarani, Secretary of Medical Education and Medicine depoartment Dr Sanjay Mukherjee, Eye specialist and Dean Dr Tatyarao Lahane, and delegation members Dr Sanjay Deshpande, Dr Anup Marar, Anil Laddhad. 
000000

1 टिप्पणी

  1. मेगाभरतीची पदे का काढली जात नाही आपण सांगितले आरोग्य विभागात 10000 पदे भरली जातील त्यापैकी 5000 हजार पदे निघाली बाकीचे पदे का काढली जात नाही

    उत्तर द्याहटवा