गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ४८९ रस्ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली दि. 10 : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (पीएमजीएसवाय) गेल्या तीन वर्षात देशभरात 1 लाख 45 हजार 198 किलोमीटरचे 27 हजार 337 रस्ते बांधण्यात आले असून महाराष्ट्रात 2 हजार 837 किलोमीटरचे 489 रस्ते बांधण्यात आले आहेत.
         

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गतदेशातील 29 राज्यांच्या ग्रामीण भागात 2016-2017 , 2017-2018 आणि  2018-2019  या तीन वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत लिखित उत्तरात दिली.


महाराष्ट्रात 2 हजार 837 कि.मी.चे 489 रस्ते

महाराष्ट्रात वर्ष 2016-2017  मध्ये 2 हजार कि.मी. आणि 700 मीटरचे 199 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-2018  मध्ये 569  कि.मी.  आणि 758 मीटरचे 196 रस्ते बांधून झाले तर वर्ष 2018-2019  मध्ये 266 कि.मी. आणि 828 मीटरच्या 94 रस्त्यांचे  बांधकाम झाले.

देशातील 29 राज्यांमध्ये अनुक्रमे वर्ष 2016-2017  मध्ये 47 हजार 446 कि.मी. आणि 300 मीटरचे 8 हजार 410 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-2018  मध्ये 48 हजार 714  कि.मी.  आणि 600 मीटरचे 9 हजार 695 रस्ते बांधून झाले  तर वर्ष 2018-2019  मध्ये 49 हजार 37  कि.मी. आणि 550 मीटरच्या 9 हजार 232 रस्त्यांचे बांधकाम झाले.
००००
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.१५२ /  दिनांक  १०.०७.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा