देशाच्या व मुंबईच्या विकासात कच्छी समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 4 : उद्योग व व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून कच्छी समाजाने देशाच्या व मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

घाटकोपर कच्छ विकास समाज व घाटकोपर गुजराती समाजाच्या वतीने आयोजित कच्छरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश महेता, आमदार राम कदम, समाजाचे अध्यक्ष प्रवीण छेडा, जितेंद्र मेहता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार व कच्छ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कच्छी भाषेतून शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, व्यापार, उद्योग याबरोबरच इतरही अनेक क्षेत्रात कच्छी समाजातील नागरिकांनी मोठे कार्य केले आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेणे हा त्या समाजाचा सन्मान आहे. युवांपासून ते ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करणे ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी बाब ठरणार आहे.

यावेळी श्री. मेहता व श्री. छेडा यांनीही मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा