विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची २९ जुलैला प्रसिद्धी

1 टिप्पणी






मुंबई, दि. 26 : विविध जिल्ह्यांतील 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 29 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.


श्री. सहारिया यांनी सांगितले की, यात 1 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 48; तर नवनिर्मित 17 अशा एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ही मतदार यादी तयार करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघाच्या 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या आधारावर ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 29 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 29 ते 31 जुलै 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 1 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
०-०-०
(Jagdish More, PRO, SEC)

1 टिप्पणी