दिघी-पुणे महामार्गाच्या निजामपूर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर - मंत्री एकनाथ शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 9 : दिघी-पुणे महामार्गाचे निजामपूर गावाबाहेरून बाह्यवळणरस्त्याच्या भूसंपादनासाठी व आराखड्याच्या अनुषंगिक मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबत  पाठपुरावा करून आरखडयास मंजुरी प्राप्त होताच तात्काळ पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

नियोजित दिघी पुणे महामार्गाचे निजामपूर गावाबाहेरून बाह्यवळणरस्ता मंजूर करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


यावेळी श्री. शिंदे म्हणाले, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या २०१९-२०२० च्या वार्षिक आराखड्यास प्रारूप मसुद्यामध्ये निजामपूर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी व अनुषंगिक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा