'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 11 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'संकल्प 33 कोटी वृक्षलागवडीचा : निर्धार हरित महाराष्ट्राचा' या विषयावर वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग शुक्रवार दि. 12 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 ते 8:00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी शिंदे-चैागुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.


वन विभागाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या काळात राज्यात सुरू केलेला वृक्ष लागवडीचा  उपक्रम, तुती लागवडीसाठी वन विभाग करत असलेले प्रयत्न, वृक्ष लागवडीमध्ये, 1926 हा हॅलो फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक, इको बटालियनचे उपक्रम, 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रशासनाची तयारी याबाबतची माहिती श्री. खारगे यांनी  'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा