कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या बैठकीत निधी वाटपाबाबत चर्चा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. यावेळी भूकंपप्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी वाटपाबाबत चर्चा झाली.


यावेळी समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराजे देसाई, आमदार शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, आमदार सदानंद चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, समितीचे सचिव सुरेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.


समितीच्या शिल्लक निधीपैकी 20 कोटी रुपयांच्या निधीचा वापर भूंकपप्रवण क्षेत्रातील सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा