वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यासाठी प्रयत्न - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 9 : वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कृषी विभाग, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडांमुळे नारळाच्या फळांचे मोठे नुकसान होते. तसेच दक्षिणेकडील काही भागात हत्तींचा उपद्रव होतो. याशिवाय गवा तसेच अन्य वन्यप्राणीदेखील पिकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात. सध्याची नुकसानभरपाईची रक्कम कमी आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. यावर डॉ. बोंडे यांनी निर्देश दिले की, नुकसानभरपाईचे निकष सुधारित करुन भरपाईच्या रकमेत  दुपटीने वाढ करण्याची शिफारस वनविभागाकडे करण्यात यावी. तसेच वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने प्रयोग करुन उपाययोजना सुचविण्याबाबत निर्देश द्यावेत. ते प्रयोग यशस्वी ठरल्यास पीक संरक्षणाच्यादृष्टीने योजना तयार करता येईल.
००००
सचिन गाढवे/विसंअ/दि.9 जुलै 2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा