'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.8: माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात  'संकल्प 33 कोटी वृक्षलागवडीचा  : निर्धार  हरित महाराष्ट्राचा' या विषयावर वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या  मुलाखतीचा पहिला भाग दूरदर्शनच्या सह्याद्री  वाहिनीवर मंगळवार दि.9 जुलै 2019 रोजी  तसेच शुक्रवार दि. 12 जुलै 2019 रोजी दुसरा भाग संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी शिंदे-चौगुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.
        
वन विभागाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या काळात राज्यात सुरू केलेला वृक्ष लागवडीचा  उपक्रम, महाराष्ट्रातील अत्यल्प वनक्षेत्र असलेल्या भागातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल, कन्या वनसमृद्धी योजना, अटल आनंदवन उपक्रम, वृक्ष लागवडीसाठी मिळत असलेला लोकसहभाग व प्रशासनाची तयारी याबाबतची माहिती श्री. खारगे यांनी  'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा