विधानभवनात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती आज विधानभवनात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले.


विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलराज्यमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार  यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य,अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतराव नाईक‍ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा