बुलढाणा, वर्धा आणि नागपूर बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 28 : शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसात नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकांची उभारणी करण्यात आली आहे परंतु बँका शेतकऱ्यांचे हित न पाहता स्वतः चा व्यवसाय पाहतात हे चुकीचे आहे. या तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरु करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा. बँकांची आणि नाबार्डची भूमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची असली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा बँका अडचणीत असलेल्या ठिकाणी जर शासकीय कार्यालये भाडे तत्वावर असतील तर ती कार्यालये जिल्हा बँकांच्या ताब्यात असलेल्या जागेत स्थलांतर केले तर त्या जागेचा उपयोग होईल आणि बँकांना मदत होईल यासंदर्भातील प्रस्तावाचा ही विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर आनस्कर, नाबार्डचे महाप्रबंधक अलोक जेना आणि बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
0000


The District Co-operative banks of Buldhana, Wardha and Nagpur district should started loan provision for farmers immediately

- Chief Minister Devendra Fadnavis
Mumbai,28.June.19: “For the welfare of farmers, State Co-operative Bank should started the BC model in Buldhana, Wardha and Nagpur district co-operative banks and provide immediate loans to farmers” ordered Chief Minister, Devendra Fadanvis.
He was speaking in a meeting held to discuss the problems of Buldhana, Wardha and Nagpur District Central Co-operative Banks in Vidhan Bhavan, today.
Mr. Fadanvis further stated that proposals for the introduction of BC model in District Central Co-operative Banks in Buldhana, Wardha and Nagpur should be forwarded by the State Co-operative Bank in two days to NABARD. NABARD should take positive decisions for farmers' welfare and give immediate approval to this proposal.
“Banks have been set up for the welfare of farmers, but it is wrong that banks look at their own business and profit without looking for benefit of farmers. All these three banks should co-ordinate with the State Co-operative Bank and NABARD to overcome the problem for introducing immediate credit to farmers. Banks and NABARD should play important role for the progress of the farmers”, said honorable chief minister.
He further said that district banks should be transferred on their own places instead of using rental places. It would help the district banks to resolve financial issues in some proportion and proper utilization of places would also take place.
Co-operation Minister, Subhash Deshmukh, Principal Secretary of Cooperative Department, Abha Shukla, Co-operation Commissioner Satish Soni, State Co-operative Bank Administrator Vidyadhar Anaskar, General Manager of NABARD Alok Jena and bank representatives were present, at the meeting.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा