महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतराज्यात शेती व शेती संलग्न कामांसाठी दीड लाख कोटींचा निधी खर्च

सातारा दि. 13: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न कामावर आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांचा निधी सरकारने खर्च केला आहे. साताऱ्यासह राज्यातील दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह नियोजनबद्ध इतर जलसंधारणाची कामे करून महाराष्ट्राच्या माथ्यावरचा दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय शिवनगर (रेठरे बुद्रुक) ता. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुकिमणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मदनराव मोहिते, नीता केळकर आदी उपस्थित होते.शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे  म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. याच तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल पद्धतीचा वापर केल्यास पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याचे काम प्रायोगिक तत्वावर राज्यातील सहा जिल्ह्यात सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सेवा सोसायट्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परावर्तित करण्याचे काम राज्यातील 10 हजार गावांमध्ये सुरू आहे.

साखर कारखानदारी हा शेतकऱ्यांचा कणा आहे, त्यामुळे या साखर उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने अत्यंत सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, साखरेला मिनिमम सेलिंग प्राईज सारखा महत्वाचा कायदा केंद्र शासनाने लागू केल्यामुळेच साखर कारखाने ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ शकले. यावर्षीही राज्यातील 96 टक्के कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांना दिले असून याबाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्याचबरोबर इथेनॉलचे नवीन धोरण आखल्यामुळे आज इथेनॉलला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या धोरणामुळे देशासमोरील इंधनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच इथेनॉलवरील जीएसटी केवळ पाच टक्के आकारल्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देणेही कारखान्यांना शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.          

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याचे काम सुरू आहे. राज्यातील तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत विविध विकासाची कामे पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम सरकारने केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेला कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे.  

यावेळी डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश भोसले यांनी केले,तर आभार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी मानले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000Funds worth one and half lakh crores to be spent on agriculture and agriculture related works in the state ;
The blot of  drought on Maharashtra state will be soon be a thing of the past
- Chief Minister Devendra Fadnavis
▪  Rs sixteen thousand crores to farmers on account of agricultural insurance.
▪ work of transforming societies in ten thousand villages into Agribusiness centers
▪ five percent Goods and Service Tax on Ethanol
▪  Ultra modern technology in agriculture , pilot project to be initiated in five districts.
▪  Link road for Karad City
 Satara Dated 13 : The Chief Minister Shri Devendra Fadnavis today asserted that the state is moving along the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. with the farmer as the center point of development. He stated that teh State Government has spent funds worth RS one and half lakh crores on agriculture and agriculture related works. The Chief Minister further asserted that the water conservation works in all the drought hit areas of the state including Satara are progressing in the planned manner and the blot of drought on Maharashtra state will soon be a thing of the past. .
The Chief Minister Shri Devendra Fadnavis today unveiled the horse mounted statue at Jaywantrao Bhosale  Krishna Agriculture College at Shiv Nagar ( Rethare Budruk ) in Karad Tehsil in Satara District.  The Chief Minister Shri Devendra Fadnavis   was addressing the farmers gathering within the premises of the college.  The Revenue Minister Shri Chandrakant Patil, Minister of State for Agriculture Shri Sadabhau Khot, Chairman of the Annasaheb Patil Development Corporation Shri Narendra Patil, Chairman of the Cooperatives Council Shri Shekhar Charhegaonkar, Chairman of the Vitthal Rukhmini Temple Trust Dr  Atul Bhosale,, Vice Chairman of the Mahaashtra Krishna Valley Development Corporation, Shri Nitin Bangude Patil, Member of the Legislature Shri Shambhjuraje Desai, Chairman of the Krishna Cooperative Sugar Factory Dr Suresh Bhosale,   Member of the Legislature Shri  Shivajirao Naik, Shri Prithviraj Deshmukh, Karad Municipal Council Chairman Smt Rohini Shinde, Shri Madanrao Mohite  and Smt Neeta Kelkar were present on the occasion .
Assuring that the work of bringing ultra modern technology in the agricultural sector is in progress,   Chief Minister Shri Devendra Fadnavis today stated that concrete measures are being taken to utilize the concepts like artificial  intelligence in the agricultural sector. The utilization of the digital system based on this technology can control the pests attacking the crop. This work is in progress on experimental basis in six districts. Similarly the service societies in ten thousand villages in the state which are very significant for the farmers will be converted into Agri Business Societies .
Stating that the sugar industry is the backbone of the farmers, the  Chief Minister Shri Devendra Fadnavis asserted that the State Government and the Central Government have taken many affirmative measures to restore the past glory of the sugar industry which has enabled the sugar factories to pay the entire  minimum fair price amount to the farmers, since the Central Government made the Minimum Selling Price Act applicable to the sugar industry. Ninety six percent of the sugar factories in the state have paid the entire payment as per the Fair Minimum Price to the farmers and Maharashtra state leads the nation on this count. Similarly a bigger market has opened up for the ethanol due to the new ethanol policy, which has paved the way to find a lasting solution to the ethanol problem facing the sugar factories. The sugar factories have benifitted from the five percent Goods and service Tax on Enthanol, which has resulted in the factories offering a better rate to the farmers   
The Revenue Minister Shri Chandrakant Patil stated that  the state is moving along the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. with the farmer as the center point of development. The State Government has ensured that the developmental works reach the last person in the society offering him a better standard of living. The poor and the deprived people in the society have received crores of rupees in assistance from the Chief Ministers Relief Fund Scheme.
Dr Atul Bhosale and Shri Madanrao Mohite also spoke on the occassion.  Dr Suresh Bhosale deliver the key note address while the Vice Chairman of the Krishna Cooperative Sugar Factory Shri jagdish Jagtap proposed the vote of thanks. Sugar cane growing farmers and citizens wee present in large numbers for the program.

0000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा