उद्या 'जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास'कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र'दिलखुलास' कार्यक्रमात पाऊस! महाराष्ट्र आहे तयारया विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 28 जून रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होईल.

दिलखुलास' या कार्यक्रमात आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रावर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत शनिवार दि. 29 जून व सोमवार  दि. 1 जुलै  2019  रोजी  प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात दुष्काळ निवारणासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, आपत्ती निवारणासंदर्भात शासनाने केलेली तयारी, राज्यातील सर्व शासकीय इमारती हरित इमारत संकल्पनेचा वापर करुन बांधण्याचा धोरणात्मक निर्णय, महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय यासंदर्भात सविस्तर माहिती महसूल मंत्री श्री. पाटील यांनी जय महाराष्ट्र'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा