साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






सुशीलकुमार शिंदे यांना युवा पुरस्कारतर सलीम सरदार मुल्ला यांना बाल साहित्य पुरस्कार

नवी दिल्ली, दि. १४ : मराठी भाषेतून कवी सुशीलकुमार शिंदे यांनाशहर आत्महत्या करायचं म्हणतया काव्यसंग्रहासाठी युवा पुरस्कारतर लेखक सलीम सरदार मुल्ला यांनाजंगल खजिन्याचा शोधया कादंबरीसाठी  बालसाहित्य पुरस्कारआज साहित्य अकादमीने  जाहीर केला आहे.

साहित्य क्षेत्रातीत प्रतिष्ठि  संस्था म्हणून गौरव असणाऱ्या साहित्य अकादमीने साहित्य अकादमी पुरस्कार २०१९ची  आज घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कांबर यांच्या अध्यक्षतेखाली अगरतळा येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २३ भाषांकरिता युवा पुरस्कारतर २२ भाषांकरिता बाल साहित्य पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली.

युवा पुरस्कारासाठी २३ प्रादेशिक भाषांमधील ११ काव्यसंग्रह, लघु कथा, कादंबरी आणि एका समीक्षात्मक पुस्तकाची निवड करण्यात आली. मराठी साहित्य मधून ठाणे (.) येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांच्याशहर आत्महत्या करायचं म्हणतया काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता गणेश आवटे, प्रफुल्ल शिलेदार आणि श्रीकांत देशमुख यांचा परक्षक मंडळामध्ये समावेश होता. 

बाल साहित्य पुरस्कारासाठी २२ प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली. मराठी साहित्यामधून सलीम सरदार मुल्ला यांच्या जंगल खजिन्याचा शोधया कादंबरीची  बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून  यावर्षी १४ नोव्हेंबर या बालदिनी विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता  धीर शिंदे, अतुल पेठे आणि  ना गवाकर यांचा परक्षक मंडळामध्ये समावेश होता. 
00000                                  
  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.132/  दिनांक  14.6.2019 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा