बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयासंदर्भात बैठक संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे काम पूर्ण होत आले आहे. हे महाविद्यालय या वर्षी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय मान्यता देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.


दरम्यान मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे या वर्षी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा