रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- अन्न व नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावल यांची माहिती

६ टिप्पण्या
रास्त भाव दुकानदारास रेशन उपलब्ध करून देणे बंधनकारक


मुंबई, दि.15 जून : रेशन कार्डधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्यास रास्तभाव दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा स्वरूपाचे परिपत्रक विभागाकडून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ग्रामीण तसेच शहरी भागातील रेशनकार्ड धारकांना रास्तभाव दुकानदार महिन्यातील ठराविक वेळेनंतर रेशन उपलब्ध करून देत नाही. या संदर्भात  विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच विधानसभा सदस्यांनी याबाबतीत सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. याची दखल घेऊन याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतेच शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. यानुसार रास्त भाव दुकानदारांवर रेशनकार्ड धारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य (रेशन) उपलब्ध करून देण्याची जबादारी निश्चित करण्यात आली आहे, असे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. रास्तभाव दुकानदाराने असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त( पुरवठा), सर्व उपायुक्त (पुरवठा), सर्व जिल्हाधिकारी, शिधावाटप नियंत्रक,  संचालक (नागरी पुरवठा, मुंबई), सर्व जिल्हा पुरवठा आधिकारी यांना परिपत्रकाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

६ टिप्पण्या

 1. रेशन दुकानदारांना योग्य वेळेत व योग्य वजनात धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणी घेणार तसेच तसेच अशा निष्काळजी पदाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारचे कारवाई होणार याचेही स्पष्टीकरण अन्न पुरवठा मंत्रालयाने लवकरच द्यावे ही छोटीशी विनंती

  उत्तर द्याहटवा
 2. तालुका चे आधिकारी रेशन दुकानदार कडून पैसे घेऊन शांत बसता कार्यवाही करत नाहीत
  कार्यवाही करा ना कार्यवाही झाली तर गरिबाचे हाल नाहीत होणार. जिल्हा पुरवठा विभाग अधिकाऱ्याला सांगायचं आहे की रेशन दुकाना मधी तक्रार वही नसते तुम्ही अचानक एका दुकानाला भेट द्या मी तुम्हाला दुकान दाखवतो त्या दुकाना मधी तक्रार वही नसेल तर लगेच त्या दुकानाचा परवाना रद्द कराना
  तुम्ही आधिकारी आहात ना मग कोणाला न सांगता लगेच तुम्ही on the sopt तुम्ही तालुका आधिकाऱ्याला न सांगता red टाका मग बघा काय सापडते ते दुकानामधे साधे दप्तर (record ) पण नसते आणि एखादया नागरिकांनी मागणी केली ना त्याला गुंड गिरीच्या शब्दात दम देणे असे चालू आहे
  हे जे बोललो ना मी हे माझ्या बाबतीत really झाले आहे
  मला फोन करा आधिकाऱ्यांनो मी तुम्हाला त्या दुकाना पर्यत घेऊन जातो
  फोन.नं.
  8208810167
  7773975036
  नाव. शरद पवार

  उत्तर द्याहटवा
 3. सब कुछ बिक चुका है पैसो के बाजार मे,अमीर के घर पाहूच जाता है माल का थैला,और गरीब के घर कभी नाही जळता चुला.साहेब 2रु. किलो का गेहू 16रु.किलो मे बिकाने वाले दुकानदार जबतक बन्द नही होते तब तक गरीब भुक के मारे रोते ही रहे गा .अपना सवाल साहेब 100% कडवा है मगर सही है

  उत्तर द्याहटवा
 4. दुकानदार पावत्याही देत नाहीत राशन बरोबर देत नाहीत पवतीवर राशन जास्त आणि देतात कमी गरीब लोकाना कोणाकडे तक्ररारही करता येत नाही

  उत्तर द्याहटवा
 5. RC नंबर वर धन्य जासतं आहे आणि कमी मिढते चिनावलता ۔रावेर येथे याची नोदं घयावी दादा

  उत्तर द्याहटवा
 6. आधार कार्ड लिंक चालू करावे परत धुळे

  उत्तर द्याहटवा