महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता जेईई परीक्षेत देशात प्रथम; मुंबईची तुलीप पांडे मुलींमध्ये तिसरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





नवी दिल्ली, दि. १४ : देशातील नामांकित  भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  मुंबईच्या तुलीप पांडे हिने मुलींमधून  तिसरा क्रमांक मिळवला आहे.



जेईई (ॲडव्हान्स) २०१९ परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.  देशभरातून १ लाख ६१ हजार ३१९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती यापैकी ३८ हजार ७०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.  चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  अहमदाबाद (गुजरात) येथील शबनम सहाय ३७२ पैकी ३०८ गुण मिळवून मुलींमधून प्रथम आली आहे. पहिल्या पाच मुलींमध्ये मुंबईच्या तुलीप पांडे हिने स्थान मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.



जेईई (ॲडव्हान्स) २०१९ परीक्षेमध्ये देशभरातून ३३ हजार ३४९ विद्यार्थी, ५ हजार ३५६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत . यातील खुल्या प्रवर्गातून एकूण १५ हजार ५६६,  खुला वर्ग (इडब्ल्यूएस) मधून ३ हजार ६३६, इतर मागासवर्गीयांमधून ७ हजार ६५१, अनुसूचित जातींमधून ८ हजार ७५८ तर अनुसूचित जमातींमधून ३ हजार ९४ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.    

०००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.133/  दिनांक  14.6.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा