रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड - रोहयोमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागामार्फत हाती घेतली जाणार आहेत. रोजगार हमी योजनामंत्री  जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

शासनाच्या रोहयो विभागामार्फत जिल्हाधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांनाही याबाबत आदेश पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून स्थानिक रोहयो मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांचे सुशोभिकरण होण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.  

रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्यातील किल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन करण्याचे कामही आता रोहयो योजनेतून करता येत आहे. त्या माध्यमातून किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. किल्ले परिसरात वृक्ष लागवड करणे, रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, जलसाठ्यांचे संवर्धन करणे अशा विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात येत आहेत. रायगड किल्ले परिसरात नवीन होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची कामे हाती घेण्यात यावीत, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण व संगोपनाच्या कामाचे नियोजन करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
०००००


Tree plantation on Riagad fort area will be done through EGS
- Minister Jaykumar Rawal
Mumbai,14.June.19: “Social Forest Department will conduct the tree plantation at Raigad fort,  in its surrounding area and on connecting roads through the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MNREGA),” informed Minister of Employment Guarantee Scheme, Jayakumar Raval.
He was speaking in a meeting held at Ministry Office, in this concern.
Mr. Rawal further informed that orders have been sent to the District Collector and Konkan Divisional Commissioner through the EGS Department to provide employment to local EGS labors, under this scheme. It would give work to labors and help to develop and beautification of roads in the historic heritage of Raigad Fort.
He further stated that various works have been undertaken under the employment guarantee scheme. Through this, there is a large number of employment generation in the state. The work of cleaning and conservation of the forts of the state can also be done through EGS. The campaign for the conservation of the fort has been undertaken through this medium. Various types of works are being undertaken for cultivation of trees, beautification of roads, conservation and forts.
Instructions have been given to the concern department for tree plantation and conservation in new line of new roads in Raigad Fort. In coordination with Raigad Development Authority, the Collector has arranged the plantation and maintenance work and ordered to submit the report to the government.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा