सिंगापूरच्या महावाणिज्‍यदूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : सिंगापूरचे महावाणिज्‍यदूत गावीन चाय आणि उप महावाणिज्‍यदूत अमिन रहिन यांनी आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्‍यान कौशल्‍य विकास, रोजगार निर्मिती व गुंतवणूक या विषयांवर विस्‍तृत चर्चा झाली. या दरम्‍यान महावाणिज्‍यदूत गावीन चाय यांनी सिंगापूर कार्पोरेशन प्रोग्रॅम बाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली तसेच सिंगापूरद्वारे भारतात करण्‍यात येणाऱ्या गुंतवणुकीबाबतसुध्‍दा यावेळी चर्चा झाली. कौशल्‍य विकास, रोजगार निर्मिती व गुंतवणुक या विषयांच्‍या अनुषंगाने धोरण ठरविण्‍यासाठी सिंगापूर दौऱ्यावर येण्‍याचे निमंत्रण महा‍वाणिज्‍यदूत गावीन चाय यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.


महाराष्‍ट्रात तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केलेला संकल्‍प व त्‍या दृष्‍टीने सुरु असलेली वृक्ष लागवडीची मोहीम पर्यावरणाविषयीची महाराष्‍ट्राची सजगता दर्शविणारी असल्‍याचे सांगत वृक्ष लागवड मोहिमेचे कौतुक महावाणिज्‍यदूत व उप महावाणिज्‍यदूतांनी या चर्चेदरम्‍यान केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा