सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतजर्मनीच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. 6 : जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, जर्मनीचे मुंबई येथील वाणिज्यदूत डॉ. जुरगन मोरहर्ड उपस्थित होते. दोन्ही देशातील सांस्कृतिक, वाणिज्यिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढावी याबाबत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची तरुण तडफदार आणि कुशल प्रशासक म्हणून जागतिक प्रतिमा असल्याचे गौरवोद्गार जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी या भेटीदरम्यान काढले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे. महाराष्ट्रात या दिशेने भरीव कामगिरी होत असल्याचे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.


पुणे येथे व्यवसाय उभारणीसाठी जर्मन उद्योजकांनी विशेष पसंती दर्शविलेली आहे. सुमारे 300 हून अधिक जर्मन कंपन्यांचे उत्पादन केंद्र पुणे जिल्ह्यात आहे तसेच, पुणे येथील जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्रालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्यासंबंधी या भेटीत चर्चा करण्यात आली. 
०००००


Germany urged to increase investment in MSME industries: CM Devendra Fadanvis
Mumbai, June 6: Chief Minister Devendra Fadanvis urged the German entrepreneurs to invest in technology, Artificial Intelligence (AI) and MSME industries in the state. The government is ready to extend all cooperation to them, he added. Fadanvis said this while interacting with German Ambassador Walter J Linder when the latter called on him at his official Varsha residence in Mumbai.
CM’s Principal Secretary Bhushan Gagrani, Chief Protocol Officer Nandkumar, Germany’s Consulate General in Mumbai Dr Jurgann Morehard were conspicuous by their presence on the occasion. The dignitaries discussed cultural, commercial and educational exchange between both the countries.
German Ambassador Walter J Linder praised the Chief Minister for his global image as a young, dynamic and expert administrator. Prime Minister Narendra Modi has given more emphasis on use of modern technology and Maharashtra is marching in this direction with massive and concrete contribution, he said.
The German entrepreneurs have shown interest in setting up business in Pune. Pune is the production centre of over 300 German companies. The German Language training centre at Pune also evoked very encouraging response from the students. Approximately 18000 Indian students are studying in Germany. Against this background, discussions were held on improving and strengthening the relations between the two nations with mutual coordination and cooperation. 

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा