साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. 13 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.


यावेळी श्री. गोरखे म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीतील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करीत आहे. साहित्‍यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी कसोशीने आणि निष्ठेने प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही श्री. गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला.
०००००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडल के
अध्यक्ष पद पर अमित गोरखे की नियुक्ति
मुंबई, दि. 13 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडल के अध्यक्ष पद पर अमित गणपत गोरखे की  नियुक्ति की गई है। महामंडल का अध्यक्ष पद का पदभार ग्रहण करने के बाद श्री. गोरखे को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनके अगले कार्य के लिए पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दी।
इस अवसर पर श्री. गोरखे ने कहा कि, अनुसूचित जाति-जनजाति के मातंग समाज व तत्सम 12 उपजाति के लोगों का आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करने के लिए मुझे नियुक्त करने पर मैं सरकार के प्रति आभार व्यक्त करता हूँ। श्री गोरखे ने विश्वास जताया कि साहित्‍यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडल की योजना गतिमान पद्धति से लागू करने के लिए वे पूरी लगन और निष्ठा से प्रयास करेंगे।

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा