‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात उद्या श्रद्धा जोशी-शर्मा यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'आर्थिक विकासातून महिलांचे सबलीकरण ' महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांची  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.7 जून 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, महिलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी घेण्यात येणारे उपक्रम, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी विषयांची माहिती  श्रीमती  श्रद्धा जोशी-शर्मा  यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा