सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 12 : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनया 6 महिन्यांच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
       

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनया 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक महिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके  प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.


प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष याप्रमाणे आहेत. - प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधार कार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षाकिंत प्रत जोडणे आवश्यक आहे.


निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक  मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जूनपर्यंत अर्ज करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.12.6.2019

००००

Marine fisheries Training course
Apply by June 20
Mumbai, June 12 : Fisheries training center has announced 6 month training course in `Marine Fisheries, Sailing and Marine engine maintenance and operations’ and has appealed the aspirants to apply for the same.
The course is run at Fisheries Training Center at Versova so that fisheries business receives a fillip. The course for this year (2019-20) would be held between July 1’st and December 31’st, 2019. The course fees are Rs. 450 per month and it would be Rs. 100 per month for the candidates from below poverty line families.
The applicants should have qualifications of being an active fisherman and healthy between the age group of 18 and 35 years. Swimming is the basic prerequisite for this course and educational qualification is minimum fourth standard pass. The candidates should have minimum 2 years of experience of fishing. The candidate should possess Aadhaar card or any biometric card.
The candidates should apply along with the recommendation of concerned organization or the certificates if the candidate hails from below poverty line with certificate authenticated by the block development officer. Those interested can apply by June 20 to Fisheries Training Center, Pandurang Ramale Marg, Tere Galli, Versova, Mumbai 61.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा