नागपूरच्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज 50 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज सह्याद्री अतिथीगृहात या विषयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपुरात मोठा ताजबाग स्थित या दर्ग्याच्या विकास आणि सौंदर्यीकरणासाठी 132.49 कोटी रुपयांचा आराखडा यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, मंजूर निधीपैकी 82.39 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. आतापर्यंत 67.58 कोटी रु. खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत. 17.71 कोटी रु चा निधी उपलब्ध आहे. आराखड्यातील सुरु असलेल्या उर्वरित कामांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती त्यास आज  झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कम्पाउंड वॉल,  रस्ते विकास,  दर्गा परिसरातील दुकानाचे शॉपिंग कॉम्पलेक्स मध्ये पुनर्वसन, स्वच्छता गृहांची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन यासारखी अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा