सासवड, दिवे, फुरसुंगी पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे तात्काळ सुरु करणार - बबनराव लोणीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 4 : सासवड, दिवे, फुरसुंगी पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे तात्काळ सुरु करणार असून यासंदर्भातील आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सासवड, दिवे, फुरसुंगी पाणीपुरवठा योजनेसंबंधी आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. यावेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री.पी. वेलारासू, सासवड नगरपालिकेचे पदाधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.लोणीकर म्हणाले, सासवड नगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करावा. त्यानुसार या योजनेचे काम त्वरित मार्गी लागेल. दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पुरंदर तालुक्यातील 8 गावे व 12 वाड्यांसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर योजनेसाठी 2030 ची लोकसंख्या विचारात घेतली आहे. दिवे व फुरसुंगी या पाणीपुरवठा योजनांचा दुरुस्ती व संबंधित खर्च हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून करण्यात येणार असल्याची माहिती श्री. लोणीकर यांनी यावेळी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा