एलिफंटा पर्यटनस्थळावर मूलभूत सुविधा निर्माण कार्यावर भर - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि 4 : एलिफंटा लेणी या जागतिक वारसा स्थळाला रोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने कराव्यात, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच एलिफंटासाठी मंजूर झालेल्या रोप वे व इतर विकास कामांबाबत त्यांनी आढावा घेतला. ते काल मंत्रालयात आयोजित एलिफंटा लेणी परिसराच्या विकास आराखडा बैठकीत बोलत होते.


यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून एलिफंटा विकास आराखड्याबाबत माहिती दिली. यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, पर्यटन विभागाचे उपसचिव श्री. शिंदे, एमबीपीटीच्या श्रीमती भावकर, एमटीडीसीचे विनय वावधने आदी अधिकारी उपस्थित होते.


प्राचीन एलिफंटा लेण्यांबाबत माहिती देणारे फलक लावण्यात येणार असून, मिनी ट्रेनचे रूपही आगामी काळात बदलणार आहे. जुन्या ट्रेनची जागा नवी आधुनिक मिनी ट्रेन घेणार आहे. तसेच लेण्यांची माहिती देणारे प्रशिक्षित गाईड तयार करणे, शौचालय बांधकाम, दुकानाचे नूतनीकरण करणे, वृक्ष लागवड करणे, स्वच्छता याबाबत उपाययोजना करणे आदींबाबतच्या कामांना  प्राधान्य देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. रावल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


वर्षाला साधारणतः  15 लाख पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. त्यादृष्टीने जेटीच्या विस्तारीकरणाबाबत पुरातत्व विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन जेटीचे विस्तारीकरण केले जाईल, असेही श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.
00000


Focus on building basic facilities at Elephanta tourist place
- Tourism Minister Jaykumar Rawal

Mumbai, June 4: In view of the number of tourists visiting the world heritage site Elephanta Leni, Tourism Minister Jaykumar Rawal has given instructions to tourism department officials to avail the basic amenities for the convenience of the tourists. In addition to this, the necessary measures should be taken to develop this tourist destination. He also reviewed the approved ropeway for Elephanta and other development works. Tourism Minister was speaking at a meeting of the development plan of Elephanta Leni area. The meeting was held in Mantralaya.
In the meeting, the officials of Maharashtra Tourism Development Corporation given a presentation about the Elephanta Development Plan.MTDC Managing Director Mr. Abhimanyu Kale, Tourism Director Mr. Dilip Gawde, Deputy Secretary of Tourism, Mr. Shinde, Mrs. Bhavarkar from MBPT, Mr.Vinay Vavdhane from MTDC among other officials were present.
 The information of the ancient Elephanta caves will be given on a board and the form of the mini train will also be changed in the coming days. The new modern mini train  will replace the old train. The minister also directed officials to give the priority to the work pertaining to training the guides, toilet construction, renewal of shops, plantation of trees, cleaning and sanitation.

Close to 15 lakh tourists visit this tourist place every year. In view of that, the extension of the Jetty, with the necessary permissions from the Archeology Department, will be done, the tourism minister said.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा