सध्याच्या कामांमुळे मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट

औरंगाबाद, दि.08 :- मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मराठवाड्यातील पुढील पिढीला दुष्काळमुक्त मराठवाडा दिसेल असा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

लासूर येथे भारतीय जैन संघटना, अरित फाऊंडेशन आणि बजाज ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार तथा अरित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, बजाज समूहाचे सी.पी.त्रिपाठी, एकनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, बजाज चारा छावणी राज्यातील आदर्श अशी चारा छावणी आहे. या ठिकाणी जनावरांची निगा, चाऱ्याची व्यवस्था, देखरेख, वैद्यकीय सुविधा, शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे गेल्या तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात अशा प्रकारचा उपक्रम स्तुत्य असून श्री.मुथा, श्री.त्रिपाठी आणि श्री.बंब यांच्या या कार्याचे विशेष कौतुक वाटते. राज्य शासनामार्फतही वेळेच्या अगोदर दुष्काळ जाहीर करण्यात आला.  दुष्काळात देण्यात येणारी आर्थिक मदत, चारा छावण्यांना परवानगी, चारा छावण्यांसाठी निधीत वाढ आदी कामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारण्यासाठी चार हजार 700 कोटी रुपये मदत दिली. त्यात राज्य सरकारने भर घालून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला. शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचनाचा लाभ झाला. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु झालेले नुकसान जलयुक्त शिवार अभियानामुळे तुलनेने कमी झाले.

मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मराठवाडा ग्रीडचा अंतिम विकासकृती आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या धरणांना पाईपच्या सहाय्याने जोडले जाईल. तसेच प्रत्येक गावात पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंत्रालयाचा पूरेपूर उपयोग करुन शेती आणि गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासन योजना तयार करीत आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची कमतरता पडू देणार नसल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाने शेतीतील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. मागील चार ते पाच वर्षात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक शेती आणि शेतीशी संलग्नित कामे यांच्यावर करण्यात आली आहे. यामध्ये जलयुक्त शिवार, सिंचन, शेतकऱ्यांना थेट मदत, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन यांचा अंतर्भाव आहे. आगामी काळात मराठवाड्यात मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात कामे होणार आहेत. वैरण विकासाचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी सातशे कोटीहून अधिक मदत दुष्काळ जाहीर केल्यानंतर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रम्हगव्हाण उपसा सिंचनच्या तिसऱ्या टप्प्यासही लवकरच सुरूवात होणार आहे, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्री.बागडे म्हणाले, पूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भयावह आहे. परंतु जलयुक्त शिवारमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभ झाला. शासनाने वेळेच्या आत दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी उपाययोजना केल्या. मात्र, यंदा सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन श्री.बागडे यांनी केले.

सुरूवातीला श्री.फडणवीस यांच्या हस्ते माती पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांमार्फत श्री.फडणवीस यांचा गाय-वासरूचे प्रतीक चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सुमीत मुंदडा 21 गावांना मोफत पाणी देत असल्याने श्री.फडणवीस यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.  श्री.फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना न्युट्रीशिअन किटचे वाटपही यावेळी करण्यात आले.


शासनाच्या एसएमएस सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
मागील वर्षी चाळीस कोटी एसएमएस शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. या तीन दिवसात पाच कोटी शेतकऱ्यांना खरीप पीक घेताना आणि घेण्यापूर्वी घ्यावयाच्या काळजीबाबत एसएमएस करण्यात आले आहेत. यंदा पाऊस थोडा उशीरा होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाई न करता शासनाच्या माहितीचा, एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवणार नाही. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या माहितीच्या आधारावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असेही श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.
00000


Due to the current work, the new generation of Marathwada will not have to face drought
- Chief Minister Devendra Fadnavis

Chief Minister visited Bajaj Fodder camp in Lasur
Dams in Marathwad will connect together

       Aurangabad, 08.JUN.19 – “Marathwada is experienced idrought conditions in whole year. The government is trying to remove this drought in Marathwada through implementation of Jalyukta Shivar scheme , Marathwada water grid, mud-free dam,, river link project,. Government has decided to set up draught free Marathwada for  the next generation .
       Mr. Fadnavis was speaking in  the program organized by the Jain organization, Arit Foundation and Bajaj Auto in Lasur. Earlier Mr. Bajwa visited Bajaj Fodder camp and talked to farmers. Speaker of Leggislative Assembly , Haribhau Bagade, President of Marathwada Development Board,Dr. Bhagwat Karad, Arit Founder president of  Arit foundation MLA Prashant Bamb, MLA Atul Save, Jain organization president Shantilal Mutha, C.P. Tripathi of Bajaj group, Eknath Jadhav were present on the occasion.
       Mr. Fadnavis said, Bajaj Fodder Camp is an ideal fodder camp in the state. In this place, cattle care, fencing, supervision, medical facilities, farmers' feeding arrangements are properly done in the last three months. Such work is commendable in Marathwada, which is full of famine, and is very much appreciated for this work of Mr. Mutha, Shri Tripti and Mr. Bamb. The Government has tried to provide relief to the farmers by providing them financial help in the drought, permission for fodder camps, increase in funding for fodder fodder etc. The Center has provided Rs 4,700 crore for the drought relief in Maharashtra. The state government enforced and provided financial relief to the farmers. The government's ambitious irrigation Jalyukta shivar campaign has benefitted for  irrigation.
       Honorable Chief Minister further stated that the final development plan of Marathwada grid is being prepared to bring Marathwada out of drought. In this, the dams of Marathwada will be connected together with pipe lines. It will also help in water supply in every village. Ministry of Water Resources has been set up by Prime Minister Narendra Modi's foresight.
       Fe informed that the state government has increased the investment in agriculture. In the last four to five years, investment of 1.5 trillion crores has been done on agriculture and agriculture related works. This includes water supply, irrigation, direct assistance to farmers, mechanization and drip irrigation. More than 700 crores aid to Aurangabad district has been done after the declaration of drought. Also, the third phase of Brahma gwana Lift irrigation will commence soon.
       Shri Bagade said, this drought is worse than the previous drought. But due to the Jalyukta Shivar, the dryland farmers were benefited. The government has announced drought relief measures much earlier.
First of all, Mati Pujan was done by Mr. Fadnavis.  After this, Mr. Fadnavis was welcomed by organizers with a symbol of his cow-calf. At this time Mr. Bamb, Mr. Tripathi, Mr. Mutha expressed their thoughts.
                 
Farmers should take advantage of government SMS service

       Last year, forty crore SMS sent to farmers. In these three days, five crore farmers will get the SMS  for taking care of the kharif crop. It is likely to rain a little late this year. Therefore, farmers should take advantage of SMS information without hurry. Therefore, it will not bring the time of double sowing to farmers. This year, the Meteorological Department estimates the possibility of good rainfall in Marathwada region. Therefore, farmers should start sowing s on the basis of government's information, said Mr. Fadnavis at this time.

00000


वर्तमान के कामों से नए पीढ़ी को सूखे की स्थिति नहीं देखनी पड़ेगी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री ने लासूर स्थित बजाज चारा छावणी को भेट दी

औरंगाबाद, दि.08 :- मराठवाडा में बारह महीने सूखे की स्थिति होने के बराबर है। जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, गाद मुक्त तालाब, गादयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ति मंत्रालय आदि के माध्यम से मराठवाडा के सूखे की स्थिति दूर करने के लिए सरकार प्रयासरत है।   इस कारण मराठवाडा की अगली पीढ़ी को सुखामुक्त मराठवाडा दिखाई देगा, यहीं सरकार का संकल्प है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज किया।
लासूर में भारतीय जैन संघटना, अरित फाऊंडेशन और बजाज ऑटो के संयुक्त तत्वावधान में आयोजित कार्यक्रम में श्री. फडणवीस बोल रहे थे। तत्पूर्वी श्री.फडणवीस ने बजाज चारा छावणी को  भेट दी और किसानों से संवाद साधा।
इस दौरान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडल के अध्यक्ष डॉ. भागवत कराड, विधायक तथा अरित फाऊंडेशन के संस्थापक अध्यक्ष प्रशांत बंब, विधायक अतुल सावे, भारतीय जैन संगठन के अध्यक्ष शांतीलाल मुथा, बजाज समुह के सी. पी. त्रिपाठी, एकनाथ जाधव आदि उपस्थित थे।
कार्यक्रम में श्री. फडणवीस ने कहा कि बजाज चारा छावणी राज्य की आदर्श चारा छावणी है। यहाँ पर पिछले तीन महीने से मवेशियों की देखभाल, चारा कीव्यवस्था, देखरेख, चिकित्सक सुविधा,  किसानों के खाने की व्यवस्था उत्तम पद्धति से की जा रही है। सूखे में जल रहे मराठवाडा में इस तरह का उपक्रम चलना बहुत हीअच्छा कार्य है, यह कहते हुये उन्होंने श्री. मुथा, श्री. त्रिपाठी और श्री. बंब के कार्य का विशेष सराहना की।  
उन्होंने कहा कि राज्य सरकार की ओर से समय के पहले सूखा घोषित किया गया। सूखे की स्थिति में दी जानेवाली आर्थिक मदद, चारा छावनियों के लिए अनुमति, चारा छावनी के लिए निधि में वृद्धि आदि कामों से किसानों को धीरज देने का प्रयास सरकार ने किया है। केंद्र सरकार ने महाराष्ट्र की सूखे की स्थिति के निवारन के लिए चार हजार 700 करोड़ रुपए की मदद दी है। उसमें राज्य सरकार ने मदद देकर किसानों को आर्थिक मदद दी। सरकार के महत्वाकांक्षी ऐसे जलयुक्त शिवार अभियान के कारण संरक्षित सिंचाई का लाभ हुआ। कम बारिश के कारण किसानों का नुकसान हुआ, लेकिन जो भी नुकसान हुआ है, वह जलयुक्त शिवार अभियान की तुलना के कारण कम हुआ है।
मराठवाड़ा को सूखे की स्थिति से बाहर निकालने के लिए मराठवाडा ग्रीड का अंतिम विकासकृति प्रारूप तैयार किया जा रहा है। इसमें  मराठवाडा के तालाब एक साथ जोड़े जाएंगे। इन तालाबों को पाईप की सहायता से जोड़ा जाएगा।  साथ ही प्रत्येक गाँव में जल आपूर्ति होने में मदद होगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के दूरदृष्टि सेजलशक्ति मंत्रालय की स्थापना की गई है।  इस मंत्रालय के का पूरा उपयोग कर प्रत्येक खेती और गाँव को जल आपूर्ति करने के लिए सरकार योजना तैयार कर रहा है। इससे मराठवाडा में पानी की कमी नहीं होने देने की बात श्री. फडणवीस  ने कहीं है।
श्री. फडणवीस ने बताया कि राज्य सरकार ने कृषि में निवेश करने में बड़े पैमाने पर वृद्धि की है।  पिछले चार से पाँच साल में डेढ़ लाख करोड़ रुपये का निवेशकृषि और कृषि  से संलग्नित कामों पर किया है। इसमें जलयुक्त शिवार, सिंचाई,  किसानों की सीधे की गई मदद, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचाई शामिल है।  आगामी दिनों में मराठवाडा में बड़े पैमाने पर मराठवाडा ग्रीड के माध्यम से काम होंगे। वैरण विकास के कार्यक्रम भी चलाए जाएंगे।
इसके अलावा श्री. फडणवीस  ने इस दौरान बताया कि औरंगाबाद जिले के लिए सातसौं  करोड़ से अधिक मदद सूखा घोषित करने के बाद की गई है। इसके साथ ही ब्रम्हगव्हाण उपसा सिंचाई तीसरे चरण  में जल्द ही शुरू होगी
कार्यक्रम में श्री. बागडे ने कहा कि पहले सूखे कि स्थिति से भी इस साल का सूखा बहुत ही भयावह है।  लेकिन जलयुक्त शिवार के कारण (कोरडवाहू) किसानों को इसका लाभ हुआ है। सरकार ने समय के पहले सूखा घोषित कर सूखे पर उपाययोजन किया है। लेकिन इस साल पानी का बहुत ही कटाक्ष से सभी ने उपयोग करने का आवाहन श्री. बागडे ने किया है।
कार्यक्रम की शुरुआत में श्री. फडणवीस ने हाथों की मिट्टी का पूजन किया गया। उसके बाद आयोजकों की ओर से श्री. फडणवीस का गाय- बछड़ा का प्रतिक चिन्ह देकर उनका स्वागत किया गया। इस दौरान श्री. बंब, श्री. त्रिपाठी, श्री. मुथा ने अपने विचार प्रस्तुत किए। श्री. मुथा, श्री. त्रिपाठी के कार्य की सरहना श्री. फडणवीस ने गाय- बछड़ा का प्रतिक चिन्ह देकर किया। साथ ही श्री. सुमीत मुंदडा 21 गांवों को नि:शुल्क पानी दिये जाने से श्री. फडणवीस के हाथों प्रशस्तीपत्र देकर उन्हें गौरवान्वित किया गया। इस दौरान श्री. फडणवीस के हाथों किसानों को न्युट्रीशियन किट का भी वितरण किया गया।

किसान सरकार की एसएमएस सेवा का लाभ ले   
श्री. फडणवीस ने इस दौरान बताया कि पिछले साल चालीस करोड़ एसएमएस किसानों को भेजे गए थे। इन तीन दिनों में पाँच करोड़ किसानों को खरीप पीक लेते समय और लेने के पहले जो खबरदारी बरतनी है,  उसके एसएमएस किए गए है। इस साल बारिश देरी से होने की संभावना है। इसलिए किसानों ने जल्दी न करते हुये सरकार के जानकारी, एसएमएस सेवा का लाभ लेना चाहिए। इससे दोबारा बुआई की नौबत किसानों पर नहीं आएगी। इस साल मौसम विभाग के अनुमान के अनुसारमराठवाड़ा में अच्छी बारिश होने संभावना है। इसलिए सरकार की जानकारी के आधार पर ही किसानों ने पिराई, बुआई करना चाहिए,

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा