खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या भेटी; दुष्काळासंदर्भातसुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा


मुंबई, 6 जून : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भेट घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सादर केले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.


दुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह यांचीही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली.केंद्रीय मंत्री श्री राजनाथसिंह यांचीही भेट घेत देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
००००


Chief Minister in Delhi for increasing the medical seats for open category
Devendra Fadnavis meets various leaders, discusses drought situation with Home Minister
Mumbai, June 6:- Chief Minister Devendra Fadnavis today met health minister Dr Harsh Vardhan in New Delhi. He said that in order to compensate the loss for the open category due to reservation for SHBC and economically weaker sections, the number of seats should be increased. Meanwhile, the Chief Minister also met Home Minister Amit Shah and Defence Minister Mr Rajnath Singh in New Delhi today. Mr Fadnavis gave Health Minister Dr Harsha Vardhan a request letter from the state government which asks him to increase 813 seats of  PG Medical branches and 1740 of medical degree. Mr Harsha Vardhan gave a positive nod and ensured Mr Fadnavis that positive action will be initiated.
Give information about drought situation

Chief Minister Devendra Fadnavis today met the Bharatiya Janata Party national president Shri Amit Shah in New Delhi and felicitated him for being appointed as the Union Home minister of Government of India. The duo discussed on various topics. Mr Fadnavis informed Mr Shah about the financial assistance given to Maharashtra from the union government and the measures taken by the State Government for mitigating the drought situation. He also congratulated and felicitated Union Minister Rajnath Singh for taking charge as Defence Minister of the nation.
०००००कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा