प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण कारवाईचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतला आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 11 : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासंदर्भात आढावा घेतला.

यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.

श्री.कदम म्हणाले, मुंबई आणि मुंबई परिसरात प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होत असून क्रॉफर्ड मार्केट आणि  दादरच्या फुल मार्केटमध्ये काही दुकानदार फुले आणि भाजी देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सरार्स वापर करताना दिसतात. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरु करुन दंड आकारावा. या परिसरात पहाटे चार-पाच वाजता प्लास्टिक घेवून गाड्या येतात. अशा गाड्यांवर कारवाई करुन पोलिसांत तक्रार दाखल करावी. असे प्लास्टिक कोणत्या शहरातून येते, त्या कंपनीचे नाव याची देखील नोंद घ्यावी.

मिठी नदी परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करुन त्यांना नोटीसा द्याव्यात. त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याच्या सूचना श्री.कदम यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला पर्यावरण विभागाचे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
००००


Environment minister Ramdas Kadam take stock of plastic ban and encroachment removal in vicinity of Mithi river

Mumbai, June 11:- Environment minister Mr. Ramdas Kadam today took a review of plastic ban and removal of encroachment near the  Mithi river in a meeting held in Mantralaya. Mayor Vishwanath Mahadeshwar, principal secretary Anil Diggikar were also present.


Speaking on the occasion Mr Kadam said that the plastic ban campaign is heading towards success in Mumbai city and Mumbai region but it has been seen that some vendors in Crawford market and flower vendors in Dadar market are using the plastic bags for giving the goods to the customers. He said that the officers of Mumbai Municipal Corporation should take strict action against them and penalize them. Mr Kadam said that the plastic bags/ carry bag vendors bring the plastic bags in vehicles around 4 to 5 a.m. and police should take action against them, he directed. 
Mr Kadam also said that it should be investigated that from which city are these plastic bags brought in Mumbai and surrounding region. He also said that the names of the companies should be noted for stringent action. Environment minister said that survey of slum dwellers near the Mithi river should be made with immediate effect and they should be serve notices. He also said that action should be taken against the unauthorized and illegal slum dwellers. Officers of the environment department and Mumbai Municipal Corporation were present in the meeting.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा